डि एन ए त पेरु शाती

हल्याने घायाळ वांझ झालेल्या धरेला
जिंकलेल्या  द्रौपदीला हरलेल्या गांधारीला
जिंकूनही हरलेल्या हरुनही जिंकलेल्या कुरुक्षेत्राला
विचारा कुणीतरी जाब माहाभारतातल्या पात्राला युद्धाने काय साध्य झाले

मुसोलिनी हिटलर लेनिन नी चर्चिचलला
विचारा बलाढ्य अमेरिकेला चिनला महाकाय खंडाल  ते  लघुकाय बेटाला
युद्धने विजय दिला की उन्माद
की पेरला नवा युद्धवाद
 विचारा लढणार्या सैनिकाला 
त्याच्या काळजीने जळणार्या कुटुंबाला
राखराँगोळी झालेल्या डोंगरदर्यला
परत सर्जन सृजन येईल का मातीला
विनाशच उपजेल माती आणि मती
का जपेल नवी प्रगतीची शांती
खोल खोल आत अंतरात मनाच्य मेंदूच्या पेशीत की गुणसूत्राच्या रचनेत
पेरुयात सहजीवनासह शंतीचा बिजमंत्र
नव्या सुर्यमालाचे मानव निर्मात शांतीचे तंत्र
 आण्वीक अस्त्रापेक्षा प्सवू शिक्षण विचार
जगा जगवा जगू द्या मंत्र अपार
चित्ररेखा जाधव

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख