मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख

पायाभूत शिक्षण अपेक्षा आणि आव्हाने खरंतर प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला तर भारतीय इतिहासाचा विचार करता प्राचिन युगापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत सर्वसामान्य समाजात शिक्षणाचे महत्त्व होते पण बहुजन समाजात शिक्षण प्रचार आणि प्रसार किंवा त्याचे महत्त्व पटवून त्यांना शिक्षण किती प्रमाणात मिळाले कसे मिळाले याचा विचार हा एक अभ्यासाचा विषय चिंतनाचा विषय नक्कीच होईल स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजात शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अत्यंत वेगाने वाढत आहे बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज या व अशा अन्य महान विभूतींनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य केले स्वतंत्र भारतीय स्वातंत्र्य पूर्वीही अनेक विचारवंतांनी इंग्रजांना भारतीय समाजाला शिक्षण मिळावे म्हणून त्यासाठी व्यवस्था करा असे अनेक वेळा निवेदन आवाहन केलेले आहे 15 ऑगस्ट 1947 आली भारत स्वतंत्र झाल्यानंतरही शिक्षण शिक्षण व्यवस्था किंवा एकंदर प्राथमिक शिक्षण हा विषय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट केला गेला शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी आणि त्याचा कायदा होण्यासाठी इसवी सन 2000 साल 2009 साल उजाडावे लागले आरटीई शिक्षण हक्क कायदा 2009 या कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणारा कायदा भारत सरकारने पास केला आणि त्याची अंमलबजावणी भारतभर सुरू झाली प्राथमिक शिक्षणाचा विचार करता मूलभूत शिक्षण किंवा पायाभूत शिक्षण किंवा त्या त्या वयोगटाला त्या त्या इयत्तेला असणाऱ्या अभ्यासक्रमानुसार पाठ्य क्रमानुसार त्यात या इयत्तेतील विद्यार्थ्याला त्या-त्या विषयानुसार किमान अध्ययन क्षमता प्राप्त असणे म्हणजेच मूलभूत शिक्षण होय साधारणपणे भाषेमध्ये श्रवण भाषण वाचन लेखन स्व अभिव्यक्ती रसग्रहण भाषासौंदर्य या कौशल्यांचा समावेश होईल तसेच गणितामध्ये संख्याज्ञान संख्यांवरील क्रिया व्यवहारी गणित सामान्य भूमिती आणि त्याचे दैनंदिन जीवनात वा वापर या मूलभूत क्षमता प्रत्येक शिकणाऱ्या मुलाला त्या-त्या इयत्तेनुसार त्याच्या वयोगटानुसार प्राप्त झाल्या पाहिजे आणि त्या प्राथमिक शिक्षणातून त्याला त्या गरजा पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन आणि समान संधी मिळणे त्या मूलभूत क्षमता पूर्ण होण्यासाठी शिक्षक शिक्षण व्यवस्था शाळा यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे त्याला त्या सुविधा मिळणे हा त्याचा अधिकार हक्क असेल त्याच बरोबर या क्षमता त्याने प्राप्त करत असताना त्याला येणाऱ्या अडचणी व त्या विषयीचे मार्गदर्शन म्हणजेच त्या त्या वर्गाच्या त्या त्या विषयाचा त्या त्या आशयाच्या घटक निहाय अपेक्षित अध्ययन निष्पत्ती म्हणजेच तो पाठ्य घटक शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्याने त्या क्षमता प्राप्त केल्या आहेत की नाही याचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यामध्ये आकारिक मूल्यमापन आणि प्रत्येक सत्राच्या शेवटी होणारे संकलित मूल्यमापन ा मूल्यमापन यामध्ये विद्यार्थ्यांना या मूलभूत क्षमता प्राप्त करण्यामध्ये येणार्‍या अडचणींचा शोध घेऊन वेळच्यावेळी त्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत सहकार्य आणि मार्गदर्शन शिक्षकाकडून मिळाले पाहिजे तसेच विद्यार्थ्याचे हे शिकणे सोपे आनंददायी व्हावे प्रत्येकाला त्याच्या गतीनुसार क्षमतेनुसार शिक्षण मिळावे त्यासाठी पुरेसे शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन असावी अशी किमान अपेक्षा इथे गृहीत धरली आहे पण सामान्यता जिथे शिकणारी पहिलीच पिढी आहे किंवा घरी मार्गदर्शन करणारे कोणी नाही तिथे शाळा आणि शाळेतले अनुभव शिक्षकांनी दिलेल्या अध्ययन अनुभव वर्गात आणि परिसरात अध्यायन कडून मिळालेले अनुभव स्वतः वाचून समजून घेऊन विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न हेच मूलभूत शिक्षणासाठी विद्यार्थ्याकडे उपलब्ध असणारे साधन आहे भाषेच्या बाबतीत विचार केला तर चव्हाण भाषण य2 कौशल्यांची जोडी आहे बरेचदा मुला ऐकतात चांगले श्रवण करतात किंवा त्या श्रावणाच्या संधी पुरेशा मिळाल्या नाहीत तर आपोआपच भाषण बोलणे संभाषण समजून घेऊन व्यक्त करणे स्वतःचे मत व्यक्त करणे स्वतःचे मत मांडणे त्याची योग्य जुळणी आणि मांडणी करताना विद्यार्थ्याला अडचणी येतात आणि यासाठी जेवणाच्या भरपूर संधी विविध विविध अनुभव मग ते चित्ररुप आतले दृश्य रुपातले मूर्त-अमूर्त शिक्षकाने सतत दिले पाहिजेत त्याचबरोबर वेळोवेळी बोलण्याच्या संधी माध्यम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजेत विद्यार्थी संभाषण भाषण करत असताना प्राथमिक स्तर म्हणजेच इयत्ता पहिली दुसरी मध्ये बोलीभाषेचा विद्यार्थ्यांनी वापर केला तरीही तो स्वीकार्य मानला जावा कारण कारण बोलीभाषेत स्वतःच्या भाषेत मूल चांगल्या पद्धतीने व्यक्त होत असतं आपलं मत मांडत असतं त्याला तसं बोलण्याची संधी मिळाली आणि प्रोत्साहन मिळालं तर हळूहळू हा प्रवास बोलीभाषेत कडून प्रमाणित भाषेकडे होतो आणि तो यशस्वी होतो याचा अनुभव मला आहे कारण घरापासून ऊन ऊन पहिलीत नुकतेच आलेले मूल शाळेत प्रवेश ते झालेले मूल घरची भाषा बोलीभाषा घेऊन शाळेत येतं आणि याच वयात जर आपण त्याला सतत त्याच्या बोलीभाषा वरून बोललं किंवा प्रमाण भाषेतच बोल असा आग्रह धरला तर एकतर प्रमाणभाषा आणि घरची भाषा यांचा प्रत्येक वेळी ताळमेळ बसेलच असे नाही त्यामुळे मूल गोंधळते आणि या गोंधळामध्ये त्याचे शिकणे समजून घेणे कमी होते आणि आत्मविश्वास कमी झाल्यामुळे काही वेळेला शिकणे थांबते किंवा शिकण्याची गती कमी होते म्हणून ऐकण्याच्या भरपूर संधी आणि बोलण्याच्या संभाषण करण्याच्या भाषण करण्याच्या विविध प्रसंगातून चित्रातून गोष्टीतून गाण्यातून संवादातून नाट्यीकरण आतून जिथे जिथे जसं जसं शक्य असेल तसं तसं प्रत्येक विद्यार्थ्याला संधी देणे आणि त्याने केलेल्या कामाचं तितकच सकारात्मक कौतुक आणि मूल्यमापन आणि हळुवार सुधारणा या गोष्टी अपेक्षित आहेत हे करत असताना अवधान घरची भाषा बोलीभाषा प्रमाण भाषेची सांगड घालताना येणे शिक्षकाने फक्त पाठ्यपुस्तक आला धरून राहणार मर्यादित अनुभव देणे पुरेसा सराव मार्गदर्शन आणि वेळ मिळणं किंवा न देणे ही कारणे नियमित शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असू शकतात पण वैयक्तिक मार्गदर्शन अभ्यास मित्र सतत सराव आणि वेळोवेळी केले जाणारे सर्वंकष सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यामुळे या क्षमता विद्यार्थ्याला प्राप्त होऊ शकतात यानंतर भाषा विषयातील क्षमता आहे वाचन आणि लेखन सामान्य दहा वाचन म्हणजे डिकोडिंग शब्द अक्षर वाक्य शब्द शहा वाचन म्हणजे वाचन नव्हे तर त्या शब्दाचा त्या वाक्याचा अर्थ समजणे म्हणजे वाचन वाचलेला मजकूर वाचलेली गोष्ट याचा सुयोग्य अर्थ समजलं म्हणजे वाचन आणि वाचल्यानंतर त्यावर स्वतःचे मत प्रतिक्रिया देना म्हणजे वाचन काही वेळेला मुलं शब्दशहा शब्द वाचतात पण त्यांना त्याचा अर्थ संदर्भ लागत नाही त्यामुळे ते वाचन डिकोडिंग अक्षर वाचन होतं खऱ्या अर्थाने वाचन होत नाही कारण सुट्टी अक्षर म्हणून शिकवलेली वाचन पद्धती संदर्भ लावायला अर्थ लावायला अर्थ समजून घ्यायला उपयोगाची नाही अशा वेळेला विद्यार्थ्यांना शब्दकोशाचा वापर करणे कठीण आणि वेगळ्या नवीन शब्दांचा पुन्हा हा संदर्भ समजून घेणे पुढचा मागचा संदर्भ समजून घेणे एकंदर परिच्छेद कथा कविता याचा संदर्भ समजून घेऊन वाचणे अपेक्षित असते आणि हे वाचन करताना मुलांच्या भावविश्वाला अनुसरून छोटे उतारे कथा कविता गाणी गोष्टी उपलब्ध करून देणे त्या कशा वाचायचा आणि समजून घ्यायचा याचे मार्गदर्शन करणे अपेक्षित असते हे करताना पुन्हा अपेक्षित आणि पुरेसा वेळ पुरेसे साहित्य उपलब्ध असणे असणारे साहित्य सातत्याने वापरणे आणि त्याचा पाठपुरावा करणे कितीक असे काय समजले समजले नसेल तर ते का समजले नाही या गोष्टी समजून घेऊन योग्य त्या सुधारणा करणे हेही महत्त्वाचा आहे यानंतर चे कौशल्य म्हणजे लेखन अनु लेखन करणं श्रुतलेखन करणं म्हणजे लेखन हे जितकं बरोबर आहे तितकंच कथा-कविता उतारा धडा परीक्षेत यातलं समजून घेऊन विचारलेल्या प्रश्नांवर किंवा स्वतःच मत मांडणार लेखन न् महत्वाचा आहे या लेखनामध्ये भाषेचे नियम आणि विरामचिन्हांचा योग्य वापर याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर व्याकरणही तितकेच महत्त्वाचे आहे पण इथेही तोच नियम लागू पडतो इयत्ता पहिली दुसरी मध्ये बोलीभाषेतील शब्द वाक्य रचनेचा स्वीकार आणि बोलीभाषेतून प्रमाणभाषा इकडे विद्यार्थ्यांचा समृद्ध प्रवास करताना अडचणी आणि आव्हाने आहेत सातत्यपूर्ण सराव वाक्य रचनेचा सराव वाचण्याची लिहिण्याची वारंवार दिली जाणारी संधी त्यासाठी विविध तंत्रे पद्धती उदाहरणार्थ माईंड मॅप कल्प फलक त्या पद्धतीच्या त्या साहित्य प्रकारानुसार भरपूर प्रमाणात वाचायला साहित्य उपलब्ध करून देणे त्यावर लिहायला प्रवृत्त करणे मार्गदर्शन करणे केलेल्या लिखाणाचे मूल्यमापन करून लिखाणाला दिशा देणे गरजेचे आहे नंतर रसग्रहण आणि अभिव्यक्ती वाचलेला करत वाचलेली कथा कविता आणि साहित्य प्रकार समजून घेऊन त्याचा आनंद घेणे कसे आहे आणि जर श्रवण भाषण वाचन लेखन ही कौशल्य विद्यार्थ्याला अवगत असतील तर अभिव्यक्तीचे कौशल्य अर्थातच विद्यार्थ्यांना प्राप्त होते फक्त त्यासाठी संधी आणि सहकार्य मिळणे आणि अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ मिळणे महत्त्वाचे आहे यानंतर गणित विषयाचा विचार करता संख्याज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे यामध्ये संख्याज्ञान विद्यार्थ्यांना असते किंवा होते पण संख्यांमधील क्रियांमध्ये मग ती बेरीज असो किंवा मजा बाकी त्यांची मांडणी संख्यांचा चढता उतरता क्रम त्याचे स्थान लहान मोठेपणा यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येतात या क्षमता प्राप्त करताना संख्या बनते कशी एकक आतून दशक दशक आतून शतक शतकातून हजार असा संख्येचा प्रवास वस्तू चित्र म्हणी माळा दशक कठे नाणी-नोटा यातून समजावून दिला तर तो प्रवास संख्याज्ञान संख्यांची समज होणं सोपं जातं फक्त संख्या चिन्ह समजावून सांगून संख्याज्ञान ा मूलभूत गणित शिक्षणातला घटक दृढ होण्यास समजण्यात खूप सार्‍या अडचणी येतात कारण गणितातल्या या अमूर्त संकल्पना मूर्त वस्तू दृश्य कृती यातून अधिक चांगल्या प्रकारे समजण्यात दृढ होण्यास सोपे जाते आणि यासाठी बालवर्गापासून विद्यार्थ्यांना संख्या या संख्याचिन्ह संख्यांची मांडणी संख्येची मोजणी यासाठी भरपूर प्रमाणात शैक्षणिक साहित्य मग ते म्हणी गोटे ग***** बियाची काड्या पाने यांच्या स्वरूपात असेल किंवा ठोकळे म्हणी माळा यांच्या स्वरूपात असते ते उपलब्ध असणे ते जास्तीत जास्त हातया हाताळायला मिळणे समजून घ्यायला मिळणे गरजेचे आहे यानंतरचा घटक म्हणजे संख्यांवरील क्रिया मध्ये हातच्याची बेरीज वजाबाकी यामध्ये अडचणी येतात हातचा द्यायचा कुठे आणि घ्यायचा कुठून ही बऱ्याच बाबतीत अवघड वाटणारी प्रक्रिया मुलांच्या मनात मानसिक गोंधळ तयार करते दशकांमध्ये दहा झाले की त्याचे शंभर होतात म्हणून त्याचा शतकात जातो ही संकल्पना पूर्ण शतक पूर्ण दशक वस्तू चित्र मात्र त्यांच्या माध्यमातून दाखवल्यास खालचा घेणे हातचा मांडणे सोपे जाते हातच्याची वजाबाकी मध्ये शतकातला शतक सुट्टा करून त्याचे दशक करून दशकात घेणे आणि मग उदाहरण सोडवणे हातचा घेणे म्हणजे सुद्धा करणं आणि ज्यातून घेतला त्यातला तो भाग कमी झाला म्हणून त्याची योग्य मांडणी करतं करणे मुलांना अडचणीचे जाते हे आव्हान पेलताना याचीसुद्धा वस्तुंच्या साह्याने मांडणी शतक दशक संख्या संच संख्या पट्टी याच्या साह्याने मांडणी करून शिकवण्यास ते सोपे जाते नाणी नोटा पैसे हा जीवन व्यवहारातला घटक आहे तो हाताळताना विद्यार्थी सहज हाताळू शकतात आणि म्हणून हातच्याची बेरीज वजाबाकी करताना आणि नोटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावले तर ते विद्यार्थ्यांना जास्त सोपे आणि सहज जाते त्यासाठी पाढे पाठ करा भागाकार यासाठी पाढे पाठ करा हे सांगण्यापेक्षा गुणाकार म्हणजे पुन्हापुन्हा केलेली बेरीज आणि त्याची योग्य पद्धतीने मांडणी आणि भागाकार म्हणजे समान वाटणी या संकल्पना प्रत्यक्ष वस्तूंच्या साहाय्याने नाणी नोटांच्या साह्याने समजावून सांगितल्यास हे समजणे सोपे जाते तसेच या क्रियांचा दैनंदिन जीवनात वापर दैनंदिन जीवनातील वस्तुं वारे उदाहरणांद्वारे दिल्यास हे जीवनानुभव विद्यार्थ्यांच्या जवळचे असतात शाब्दिक उदाहरण यांच्याबाबतीतही अडचण येते कारण उदाहरण वाचणे दिलेले घटक काय काढायचे काय उत्तर कशाचे काढायचे कशाच्या मदतीने काढायचे ते कसे समजून घ्यायचे हे विद्यार्थ्यांना अडचणीचे जाते गणिती शाब्दिक उदाहरण वाचता येणे ते समजून घेणे त्यातले घटक समजून घेणे उत्तर काढण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया समजून घेणे क्रिया साठी वापरला जाणारा शब्दांचा नेमका अर्थ समजण्यासाठी विविध माध्यमातून कृतीतून हे समजावून महत्त्वाचा आहे उरले किती शिल्लक किती फरक किती राहिले किती किती नि कमी या सगळ्या गोष्टी म्हणजेच वजाबाकी हे मुलांना समजणे गरजेचे आहे एका वरून अनेक वस्तूंची किंमत काढताना गुणाकार आणि अनेक वस्तू वरून एका ची किंमत काढताना भागाकार हे सुद्धा समजणे गरजेचे आहे एकदा संख्या आणि संख्या ज्ञानाच्या प्रक्रिया समजून घेतल्या त्या पक्क्या झाल्या की पुढे गणित 64 गणिती कौशल्य आणि गणिती मांडणी गणित विषयाचा अभ्यास अवघड वाटत नाही हसत खेळत हे गणित सोडवणं गणित विषयाची आवड निर्माण होऊन आणि त्यासाठी प्रत्येक वर्गात प्रत्येक शाळेत प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार त्याच्या कुवतीनुसार त्याच्या गतीनुसार शिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी सतत मार्गदर्शन आणि भरपूर साहित्य आणि आणि गणिती क्रिया गणित सोडवताना गणित विषयात येणाऱ्या अडचणींचा शोध घेताना नेमकं काय समजले मी काय समजलं नाही चुकतंय कुठे हे प्रत्यक्ष कृतीद्वारे समजल्या समजावून सांगितल्यास गणित सोपे होईल आणि या विषयातील मूलभूत कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त करणे सोपे जाईल मूलभूत शिक्षणातील भाषा गणित विषयातील ही आव्हाने आहेत या क्षमता प्राप्त करण्यासाठी सातत्याचे शाळा समाज शिक्षक-पालक व विद्यार्थी यांचे स्वतःचे प्रयत्न शैक्षणिक साहित्याचा वापर वयोगटानुसार गरजेनुसार खूप शैक्षणिक साहित्य उपलब्ध असणे ते विद्यार्थ्यांना हाताळता येणे नियुक्त आनंददायी बालस्नेही पद्धतीने शिक्षण मिळणे हे या क्षमता प्राप्त करण्यासाठी गरजेचे आहे असे मला वाटते

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके