Posts

Showing posts from March, 2022

डि एन ए त पेरु शाती

हल्याने घायाळ वांझ झालेल्या धरेला जिंकलेल्या  द्रौपदीला हरलेल्या गांधारीला जिंकूनही हरलेल्या हरुनही जिंकलेल्या कुरुक्षेत्राला विचारा कुणीतरी जाब माहाभारतातल्या पात्राला युद्धाने काय साध्य झाले मुसोलिनी हिटलर लेनिन नी चर्चिचलला विचारा बलाढ्य अमेरिकेला चिनला महाकाय खंडाल  ते  लघुकाय बेटाला युद्धने विजय दिला की उन्माद की पेरला नवा युद्धवाद  विचारा लढणार्या सैनिकाला  त्याच्या काळजीने जळणार्या कुटुंबाला राखराँगोळी झालेल्या डोंगरदर्यला परत सर्जन सृजन येईल का मातीला विनाशच उपजेल माती आणि मती का जपेल नवी प्रगतीची शांती खोल खोल आत अंतरात मनाच्य मेंदूच्या पेशीत की गुणसूत्राच्या रचनेत पेरुयात सहजीवनासह शंतीचा बिजमंत्र नव्या सुर्यमालाचे मानव निर्मात शांतीचे तंत्र  आण्वीक अस्त्रापेक्षा प्सवू शिक्षण विचार जगा जगवा जगू द्या मंत्र अपार चित्ररेखा जाधव

बुद्धनिती

बुद्धनिती  युद्ध शब्द आहे फक्त अडीच अक्षरांचा  या युद्धाला विरुद्धार्थी शब्द शांतीचा  खरंच भय आणि भीती कुठे आणि किती  युद्धाला फक्त पर्याय शांती विध्वंसाचे विनाशाचं नाव असतं युद्धनीती   सहजीवनाची वाटचाल   नाव शांती  नाकारून विनाशाचे युद्धनीती माझ्या देशाने जगाला दिलीय बुद्ध नीती  युद्ध नको शांती  हवी  संघर्ष नको प्रगती हवी  कारण संघर्षात आणि युद्धात भरडले जातात सारेजण   करपतात   स्त्रीजन्माचे हुंकार सर्जन सृजन होरपळ नव्या आशेची आणि युगाचे  बालाँकुर  धगधगत्या ज्वाला निखारे   गोळे बंदुका  क्षेपणास्त्र विखारे  नसतंच कधी विकासाचं शांतीचा सहजीवनाची फ फक्त विध्वंस  माणसाचा माणुसकीचा    हवा जर विकास आणि प्रगती  जोडलेली माणुसकीची नाती  सोबत घेऊन निसर्ग साथी  भीती नको  त्याग युद्धनिती सहजीवन विकासात्मक शांती चिरंतन शाश्वत अहिंसा   मूल्य नीती घडवील मनूची सदोदित प्रगती चित्ररेखा जाधव रायगड