Posts

Showing posts from April, 2022

मराठीची गोडी

*विलक्षण  मराठी  भाषा......* *छंदश्रीमंत* ..... *रस्ता - मार्ग* * जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता. * जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग. *खरं - सत्य* *  बोलणं खरं असतं. * सत्याला  सोबत पुरावा जोडावा लागतो. *घसरडं - निसरडं* * पडून झालं की घसरडं. * सावरता येतं ते निसरडं. *अंधार - काळोख* * विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार. * निसर्गात जाणवतो तो काळोख. *पडणं - धडपडणं* * पडणं हे अनिवार्य. * धडपडणं हे कदाचित सावरणं. *पाहणं - बघणं* * आपण स्वत:हून पाहतो. * दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं. *पळणं - धावणं* * पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं. * ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं. *झाडं - वृक्ष* * जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं. * जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष. *खेळणं - बागडणं* * जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं. * जे मुक्त असतं ते बागडणं. *ढग - मेघ* * जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग. * जे नक्की बरसतात ते मेघ. *रिकामा - मोकळा*  * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा.  * आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ. *निवांत - शांत* *कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा. * काहीच न करत...