स..... सोशल मिडिआ ( रेस्ट ) चा ! विठ्ठल पांडे जुन्नर, पुणे. एक माणूस गावाच्या कोपऱ्यावर बसून असायचा. सकाळी गायी डोंगरावर चरायला जाताना तो त्या मोजायचा. सायंकाळी गायी परतून आल्या की पुन्हा मोजायचा. आठवडेंआठवडे. महिनोंमहिने. वर्षानुवर्ष. तेच काम.सकाळ संध्याकाळ गायी मोजायच्या. एक दिवस बुद्धांनी त्या माणसाला विचारलं, तुझ्या यात किती गायी आहेत ? तो माणूस म्हणाला, एकही नाही ! मग बुद्ध त्या माणसाला म्हणाले, मग विनामतलब गायी मोजण्यात अर्थ काय ? आपली सध्याची गत त्या गायी मोजणाऱ्या माणसासारखीच झाली आहे. आपला सुतरामही संबंध नसलेल्या विषयावर सोशल मिडिआवर आपण निरर्थक चर्चा करत असतो. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंतच्या निवडणुकीबद्दल आपले मत असतेच असते. आणि आपण ते व्यक्त करतोच करतो. विराट कोहली पासून अनिल अंबानींपर्यंत सगळ्यांना आपण बिनादिक्कत सल्ले देत असतो.एखाद्या विषयावर आपण व्यक्त झालो नाही तर आपण बेदखल होऊ की काय अशी भीती आपल्याला सतावत राहते. 'आम्ही चर्चाळू' हे आपलं जणू ब्रीदवाक्यच झालंय ! बरं या चर्चा अभ्यासू वगैरे काहीतरी असाव्यात अशी साधी अपेक्षा तर त्याही पुन्हा व्हाट्स अँपच्याच अर्ध्यामुर्ध्या माहितीवर अधारित. म्हणजे ही मतंही तुमची नसतातंच. ती 'बनवलेली' असतात. तुम्हाला त्रयस्थ ठिकाणावरून निरर्थक विषयांचे दाणे उडवून कोंबड्यांसारखं आपसात कुणीतरी झुंजवत असतं.म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सोशल मिडिआचे दुहेरी बळी ठरता. सात आंधळ्यांच्या हत्ती सारखं तुमच्यावर सोशल मिडिआतील paid I T cell कडून जो मारा होतो आणि त्यातून तुमचं जे मत बनतं तेच तुम्ही अंतिम सत्य मानू लागता. विशेष म्हणजे तुम्ही तुकड्या तुकड्यांतून व्यक्त होता. सलगता आणि सहजता हरवून बसता. सोशल मिडिआत वारंवार व्यक्त होण्यातून तुमची एक प्रतिमा बनवली जाते. विशिष्ट विचारसरणीचाच म्हणून तुमच्यावर शिक्का बसतो. तुम्हाला गृहीत धरलं जातं. आणि ही बाब खूप गंभीर आहे. या प्रतिमेपलीकडचेही खरं म्हणजे तुम्ही खूप काही असता पण 'सच्चा झूठा' तल्या राजेश खन्नासारखं तुम्हाला स्वतःला सिद्ध करत बसावं लागतं. आपल्या प्रतिमानिर्मितीतून अमेरिकासारख्या बलाढ्य राष्ट्राचंही निवडणूकतलं जनमतंही फिरवता येतं हे फेसबुकनेच कबूल केलंय. सोशल मिडिआचे आपल्या सार्वजनिक जीवनावरील थेट परिणाम अभ्यासायचे असतील तर रवी आमलेंचं ' प्रचारभान ' हे सदर आणि स्वाती चतुर्वेदींचं ' I am a Troll ' ही पुस्तकं वाचायलाचं हवीत. खरं म्हणजे सोशल मिडिआ भारतात येऊन, बाळसं धरुन, गुटगुटीत होऊन, स्थिरावून फार काळ लोटलाय. त्यामुळे त्याच्या फायद्या तोट्यांवर बोलण्यात आता काही अर्थ नाही. सोशल मिडिआ हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे सत्य आपण केंव्हाच पचवून टाकलंय. सोशल मिडिआ नाकारण्यात काही हाशील नाही. आणि ते शक्यही नाही. कारण आता तुम्हाला सोशल मिडिआ वापरु नका असा संदेश सर्वांपर्यंत पोहचवायचा असेल तर त्यासाठी पुन्हा सोशल मिडिआचाच वापर करावा लागेल इतका तो आपल्यावर 'हावी' झालाय. पण सोशल मिडिआ वापरणं न वापरण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न आहे तो वापरण्याच्या तारतम्याचा ! सोशल मिडिआमुळे तुम्ही सतत एका अभासी जगात वावरता. खोट्या खोट्या. Virtual. आणि नंतर तेच जग खरं मानायला लागता. खरं म्हणजे तुमच्या जगण्याशी संबधित गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. तुमच्या आनंदाच्या जागा वेगळ्याच असतात. एखादं उमललेलं टवटवीत फूल , एखाद्या बाळाच्या गालावरचं निखळ हसू , शाळेला बागडंत चाललेली मुलं असं काहीही. मदर्स डे ला आईबरोबरचा फोटो स्टेटसला ठेवणारे आपण घरातल्या घरात एकत्र राहूनही आपल्याला आईचा उबदार स्पर्श होऊन किंवा वडीलांशी आपला प्रेमळ संवाद घडून किती काळ लोटला याची आपल्याला जाणीव होते का ? आपण जिवलग मित्राबरोबर हॉटेलात शेवटची भेळ कधी खाल्ली होती किंवा एक कटींग चहा कधी घेतला होता हे आपल्यालाआठवतंय तरी का ? पण आपण मात्र भरलेल्या ताटांचा फोटो काढून एकमेकांना पाठवण्यात खोटा खोटा अभासी आनंद मिळवतो. एकदा एका मुलाने त्याचं प्रोफाईल स्टेटस sleeping ठेवलं होतं. दोन दिवस तेच status पाहून एक मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते, अगं दोन दिवसांपासून sleeping असंच status आहे. मेलं बिलं तं नसंल ना ते. वरकरणी हा विनोद वाटला तरी तो आजच्या परिस्थितीवर अचूक भाष्य करतो. अलिकडे तुम्ही ऑनलाईन असाल तरच जिवंत असता. तुम्ही ऑफलाईन आहात ही तुमच्या मित्रमंडळीत चर्चेची बातमी होऊन बसते. काही वर्षांनी तुम्ही दुपारी ३ ते ४ या वेळात ऑफलाईन होतात म्हणजे नेमके कोणत्या संशयास्पद कारवाईत गुंतला होतात म्हणून पोलीस दारात येऊन धडकले नाही म्हणजे मिळवलीत. सोशल मिडिआचा सर्वांत मोठा परिणाम झालाय तो मानवी नात्यांवर. आपल्या नात्यांची परिभाषा नव्यानेच आखली जावी इतका तो स्पष्ट परिणाम आहे. सोशल मिडिआमुळे कोणती मुख्य गोष्ट घडली असेल तर ती म्हणजे आपण सगळेच जण खूप स्वस्त झालोत. I am Free but not available हे मान्यच केलं जात नाही. तुम्ही कायम एक available object होऊन बसता. आहे ना contact list मध्ये favourite contacts मध्ये whatsapp group मध्ये मग एका नेणीवेच्या पातळीवर फक्त आपण राहतो. जाणीवेत असूच याची शक्यता नाही. आसक्ती आपुलकी या तर फार पुढच्या गोष्टी. जाता येता hi hello च्या टपल्या मारल्या, Good Morning Good night चा भक्तीभावाने रतीब घातला की काम संपलं. सोशल मिडिआ मुळे आपण सोशल होणं तर सोडाच उलट फारच खाजगीपणाचं स्तोम माजवून बसलोय.You can touch each other but you can not touch each other's cellphone असं एक Cote वाचल्याचं आठवतं. त्यातला तिरकसपणा आपली आपापसातली उसवलेली नात्यांची वीणचं अधोरेखीत करतो. अलीकडेच एक व्यंगचित्र पाहण्यात आलं. पती पत्नीला विचारतोय , तुझं नेट प्याक संपलाय का ? ती विचारतेय, का हो ? पती म्हणतोय, नाही मी तुला दोनदा डाळ वाढ अशी रिकवेस्ट पोस्ट टाकलीय. तू पाहिलीच नाहीस म्हणून म्हटलं. हे व्यंगचित्र आपल्यातल्या खुंटलेल्या संवादाचेच द्योतक नाहीतर काय ? कुणी आपला डीपी ठेवला नाही म्हणून आत्महत्या, नातं स्विकारत नाही म्हणून फेसबुक लाईव्ह आत्महत्या, रेल्वे स्टंट्स, व्यवस्थित रेंज नाही म्हणून जीवनंच संपवणं ही तर फारच टोकाची पावलं. म्हणून तर ' No Gadgets Day ' आणि 'सोशल मिडिआ व्यसनमुक्ती केंद्रां' ची गरज भासू लागलीय. कित्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाचं फार मोठं श्रेय सोशल मिडिआवर फारसं सक्रीय नसण्याला दिलंय. उद्योगपती रतन टाटा स्वतः सोशल मिडिआपासून अलिप्त असतात. बील गेट्स आपली ९० % संपत्ती दान करतात आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या लहानग्या मुलींत रमतो यातंच सगळं काही आलं. सोशल मिडिआवर संपूर्णतः काट मारून माघारी फिरणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे हे ही खरं आहे. आपल्या सभोवतालच्या गोष्टी थांबणार नाहीयेत. थांबायला आपण हवं. थोड्या थोड्या काळासाठी.यातून आपल्याला आपला संयम जसा आजमवता येईल तसं आपण सोशल मिडिआवर सक्रीय नसतानाही तुम्हाला केवळ एक virtual object न मानता तुमच्या पर्यंत कोण पोहोचतं हे ही पडताळून बघता येईल. नात्यांची पारख होईल. नाती Refill Refresh तरी होतील. शेवटी फोल्डरमधल्या जुन्या गोष्टी घालवल्या तरच नवीन गोष्टींना जागा होईल ना ? आणि त्यासाठी हवी सोशल मिडिआ रेस्ट ! अशी रेस्ट अधून मधून गरजेचीच आहे. साहिर लुधियानवी साहेबांची एक मशहूर नज्म आहे. ती लुधियानवींनी वेगळ्या संदर्भात वापरली आहे.पण इथे ती चपखल बसते. साहिलजी लिहितात : चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाजी की न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरों से खरोखरं सोशल मिडिआ पुन्हा आपल्याला अपरिचीत नाही तरी अतिपरिचित न व्हावा आणि आपणही त्याच्याकडे गलत अंदाज ने पाहू नये हीच भावना या शायरीतून व्यक्त होते. आत्ता आत्ता भिमाशंकर दुर्गूबाई वरसूबाईचे हिरवेगार डोंगर सोनकी, पिवळीच्या फुलांनी गदगदून जातील. मला साद घालतील.सोशल रेस्ट घेऊन मी ही या सादेला ओ देईल. आपल्या मुलांचा हात धरून आपण अ... आईचा अशी धुळाक्षरे गिरवतोच ना ? आता आपण स्वतःच स्वतःचा हात धरून स... सोशल मिडिआ ( रेस्ट ) चा ही नवीन धुळाक्षरे गिरवायला हवीत !
स.....
सोशल मिडिआ ( रेस्ट ) चा !
विठ्ठल पांडे
जुन्नर, पुणे.
एक माणूस गावाच्या कोपऱ्यावर बसून असायचा. सकाळी गायी डोंगरावर चरायला जाताना तो त्या मोजायचा. सायंकाळी गायी परतून आल्या की पुन्हा मोजायचा. आठवडेंआठवडे. महिनोंमहिने. वर्षानुवर्ष. तेच काम.सकाळ संध्याकाळ गायी मोजायच्या. एक दिवस बुद्धांनी त्या माणसाला विचारलं, तुझ्या यात किती गायी आहेत ? तो माणूस म्हणाला, एकही नाही ! मग बुद्ध त्या माणसाला म्हणाले, मग विनामतलब गायी मोजण्यात अर्थ काय ?
आपली सध्याची गत त्या गायी मोजणाऱ्या माणसासारखीच झाली आहे. आपला सुतरामही संबंध नसलेल्या विषयावर सोशल मिडिआवर आपण निरर्थक चर्चा करत असतो. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंतच्या निवडणुकीबद्दल आपले मत असतेच असते. आणि आपण ते व्यक्त करतोच करतो. विराट कोहली पासून अनिल अंबानींपर्यंत सगळ्यांना आपण बिनादिक्कत सल्ले देत असतो.एखाद्या विषयावर आपण व्यक्त झालो नाही तर आपण बेदखल होऊ की काय अशी भीती आपल्याला सतावत राहते. 'आम्ही चर्चाळू' हे आपलं जणू ब्रीदवाक्यच झालंय ! बरं या चर्चा अभ्यासू वगैरे काहीतरी असाव्यात अशी साधी अपेक्षा तर त्याही पुन्हा व्हाट्स अँपच्याच अर्ध्यामुर्ध्या माहितीवर अधारित. म्हणजे ही मतंही तुमची नसतातंच. ती 'बनवलेली' असतात. तुम्हाला त्रयस्थ ठिकाणावरून निरर्थक विषयांचे दाणे उडवून कोंबड्यांसारखं आपसात कुणीतरी झुंजवत असतं.म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सोशल मिडिआचे दुहेरी बळी ठरता. सात आंधळ्यांच्या हत्ती सारखं तुमच्यावर सोशल मिडिआतील paid I T cell कडून जो मारा होतो आणि त्यातून तुमचं जे मत बनतं तेच तुम्ही अंतिम सत्य मानू लागता. विशेष म्हणजे तुम्ही तुकड्या तुकड्यांतून व्यक्त होता. सलगता आणि सहजता हरवून बसता. सोशल मिडिआत वारंवार व्यक्त होण्यातून तुमची एक प्रतिमा बनवली जाते. विशिष्ट विचारसरणीचाच म्हणून तुमच्यावर शिक्का बसतो. तुम्हाला गृहीत धरलं जातं. आणि ही बाब खूप गंभीर आहे. या प्रतिमेपलीकडचेही खरं म्हणजे तुम्ही खूप काही असता पण 'सच्चा झूठा' तल्या राजेश खन्नासारखं तुम्हाला स्वतःला सिद्ध करत बसावं लागतं. आपल्या प्रतिमानिर्मितीतून अमेरिकासारख्या बलाढ्य राष्ट्राचंही निवडणूकतलं जनमतंही फिरवता येतं हे फेसबुकनेच कबूल केलंय. सोशल मिडिआचे आपल्या सार्वजनिक जीवनावरील थेट परिणाम अभ्यासायचे असतील तर रवी आमलेंचं ' प्रचारभान ' हे सदर आणि स्वाती चतुर्वेदींचं ' I am a Troll ' ही पुस्तकं वाचायलाचं हवीत.
खरं म्हणजे सोशल मिडिआ भारतात येऊन, बाळसं धरुन, गुटगुटीत होऊन, स्थिरावून फार काळ लोटलाय. त्यामुळे त्याच्या फायद्या तोट्यांवर बोलण्यात आता काही अर्थ नाही. सोशल मिडिआ हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे सत्य आपण केंव्हाच पचवून टाकलंय. सोशल मिडिआ नाकारण्यात काही हाशील नाही. आणि ते शक्यही नाही. कारण आता तुम्हाला सोशल मिडिआ वापरु नका असा संदेश सर्वांपर्यंत पोहचवायचा असेल तर त्यासाठी पुन्हा सोशल मिडिआचाच वापर करावा लागेल इतका तो आपल्यावर 'हावी' झालाय. पण सोशल मिडिआ वापरणं न वापरण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न आहे तो वापरण्याच्या तारतम्याचा !
सोशल मिडिआमुळे तुम्ही सतत एका अभासी जगात वावरता. खोट्या खोट्या. Virtual. आणि नंतर तेच जग खरं मानायला लागता. खरं म्हणजे तुमच्या जगण्याशी संबधित गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. तुमच्या आनंदाच्या जागा वेगळ्याच असतात. एखादं उमललेलं टवटवीत फूल , एखाद्या बाळाच्या गालावरचं निखळ हसू , शाळेला बागडंत चाललेली मुलं असं काहीही. मदर्स डे ला आईबरोबरचा फोटो स्टेटसला ठेवणारे आपण घरातल्या घरात एकत्र राहूनही आपल्याला आईचा उबदार स्पर्श होऊन किंवा वडीलांशी आपला प्रेमळ संवाद घडून किती काळ लोटला याची आपल्याला जाणीव होते का ? आपण जिवलग मित्राबरोबर हॉटेलात शेवटची भेळ कधी खाल्ली होती किंवा एक कटींग चहा कधी घेतला होता हे आपल्यालाआठवतंय तरी का ? पण आपण मात्र भरलेल्या ताटांचा फोटो काढून एकमेकांना पाठवण्यात खोटा खोटा अभासी आनंद मिळवतो.
एकदा एका मुलाने त्याचं प्रोफाईल स्टेटस sleeping ठेवलं होतं. दोन दिवस तेच status पाहून एक मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते, अगं दोन दिवसांपासून sleeping असंच status आहे. मेलं बिलं तं नसंल ना ते. वरकरणी हा विनोद वाटला तरी तो आजच्या परिस्थितीवर अचूक भाष्य करतो. अलिकडे तुम्ही ऑनलाईन असाल तरच जिवंत असता. तुम्ही ऑफलाईन आहात ही तुमच्या मित्रमंडळीत चर्चेची बातमी होऊन बसते. काही वर्षांनी तुम्ही दुपारी ३ ते ४ या वेळात ऑफलाईन होतात म्हणजे नेमके कोणत्या संशयास्पद कारवाईत गुंतला होतात म्हणून पोलीस दारात येऊन धडकले नाही म्हणजे मिळवलीत.
सोशल मिडिआचा सर्वांत मोठा परिणाम झालाय तो मानवी नात्यांवर. आपल्या नात्यांची परिभाषा नव्यानेच आखली जावी इतका तो स्पष्ट परिणाम आहे. सोशल मिडिआमुळे कोणती मुख्य गोष्ट घडली असेल तर ती म्हणजे आपण सगळेच जण खूप स्वस्त झालोत. I am Free but not available हे मान्यच केलं जात नाही. तुम्ही कायम एक available object होऊन बसता. आहे ना contact list मध्ये favourite contacts मध्ये whatsapp group मध्ये मग एका नेणीवेच्या पातळीवर फक्त आपण राहतो. जाणीवेत असूच याची शक्यता नाही. आसक्ती आपुलकी या तर फार पुढच्या गोष्टी. जाता येता hi hello च्या टपल्या मारल्या, Good Morning Good night चा भक्तीभावाने रतीब घातला की काम संपलं.
सोशल मिडिआ मुळे आपण सोशल होणं तर सोडाच उलट फारच खाजगीपणाचं स्तोम माजवून बसलोय.You can touch each other but you can not touch each other's cellphone असं एक Cote वाचल्याचं आठवतं. त्यातला तिरकसपणा आपली आपापसातली उसवलेली नात्यांची वीणचं अधोरेखीत करतो. अलीकडेच एक व्यंगचित्र पाहण्यात आलं. पती पत्नीला विचारतोय , तुझं नेट प्याक संपलाय का ? ती विचारतेय, का हो ? पती म्हणतोय, नाही मी तुला दोनदा डाळ वाढ अशी रिकवेस्ट पोस्ट टाकलीय. तू पाहिलीच नाहीस म्हणून म्हटलं. हे व्यंगचित्र आपल्यातल्या खुंटलेल्या संवादाचेच द्योतक नाहीतर काय ? कुणी आपला डीपी ठेवला नाही म्हणून आत्महत्या, नातं स्विकारत नाही म्हणून फेसबुक लाईव्ह आत्महत्या, रेल्वे स्टंट्स, व्यवस्थित रेंज नाही म्हणून जीवनंच संपवणं ही तर फारच टोकाची पावलं. म्हणून तर ' No Gadgets Day ' आणि 'सोशल मिडिआ व्यसनमुक्ती केंद्रां' ची गरज भासू लागलीय.
कित्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाचं फार मोठं श्रेय सोशल मिडिआवर फारसं सक्रीय नसण्याला दिलंय. उद्योगपती रतन टाटा स्वतः सोशल मिडिआपासून अलिप्त असतात. बील गेट्स आपली ९० % संपत्ती दान करतात आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या लहानग्या मुलींत रमतो यातंच सगळं काही आलं.
सोशल मिडिआवर संपूर्णतः काट मारून माघारी फिरणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे हे ही खरं आहे. आपल्या सभोवतालच्या गोष्टी थांबणार नाहीयेत. थांबायला आपण हवं. थोड्या थोड्या काळासाठी.यातून आपल्याला आपला संयम जसा आजमवता येईल तसं आपण सोशल मिडिआवर सक्रीय नसतानाही तुम्हाला केवळ एक virtual object न मानता तुमच्या पर्यंत कोण पोहोचतं हे ही पडताळून बघता येईल. नात्यांची पारख होईल. नाती Refill Refresh तरी होतील. शेवटी फोल्डरमधल्या जुन्या गोष्टी घालवल्या तरच नवीन गोष्टींना जागा होईल ना ? आणि त्यासाठी हवी सोशल मिडिआ रेस्ट ! अशी रेस्ट अधून मधून गरजेचीच आहे.
साहिर लुधियानवी साहेबांची एक मशहूर नज्म आहे. ती लुधियानवींनी वेगळ्या संदर्भात वापरली आहे.पण इथे ती चपखल बसते. साहिलजी लिहितात :
चलो इक बार फिर से
अजनबी बन जाएं हम दोनों
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ
दिलनवाजी की
न तुम मेरी तरफ देखो
गलत अंदाज नजरों से
खरोखरं सोशल मिडिआ पुन्हा आपल्याला अपरिचीत नाही तरी अतिपरिचित न व्हावा आणि आपणही त्याच्याकडे गलत अंदाज ने पाहू नये हीच भावना या शायरीतून व्यक्त होते.
आत्ता आत्ता भिमाशंकर दुर्गूबाई वरसूबाईचे हिरवेगार डोंगर सोनकी, पिवळीच्या फुलांनी गदगदून जातील. मला साद घालतील.सोशल रेस्ट घेऊन मी ही या सादेला ओ देईल.
आपल्या मुलांचा हात धरून आपण अ... आईचा अशी धुळाक्षरे गिरवतोच ना ? आता आपण स्वतःच स्वतःचा हात धरून स... सोशल मिडिआ ( रेस्ट ) चा ही नवीन धुळाक्षरे गिरवायला हवीत !
Comments
Post a Comment