नविन ठिकाणी रुजू झालेली मी सहजच म्हटल कोण ग ही मृगनयनी का नाही येत शाळेत माहीत नाही टिचर .चौकशी करता समजलं ती  अपंग (दिव्यांग)आहे भेटाव तिला म्हणून पाऊले वळली घराकडे तिच्या
गेले घरात .बाळाच्या आईने बसा म्हटल हाँल मधे छोट्याशा गोधडीवर मृगा पहुडलेली .सुंदर राजकुमारी गोरीपान  मोरपंखी रंगाच्या हरिणासारख्या  डोळ्याची गोजीरी बाहुली जणू मृगनयनी आई पाणी आणायला आत गेली .उन्हातून आलेल्या मला थंड पाणी  द्यावं म्हणून ते आणायला ती शेजारी गेली आलेच हं बसा टिचार म्हणाली.मी सोफ्यावरन उठून परी शेजारी जमिनीवर बसले ओ सोना बेटा म्हाणून आवाज देऊ लागले बाहेर गणपती आगमनाच्या  कार्यक्रमाच्या  मिरवणुकीत बँडचा आवाज येत होता परीची मान त्या दिशेला हलत होती गोधडीवरच गोल फिरत होती लुकलुकणारे निळे डोळे किती सुंदर.माझ्याशी जणू बोलतायत किती गोड आहे पिल्लू मी म्हटल हे बाळा बघ न इकडे म्हटलं  हातात पाण्याचा ग्लास देत आई म्हणाली टिचर तिला दृष्टी येईल म्हणून दोन आँपरेशन केले आणि संपूर्ण दृष्टीच गेली तिची.
टिचर तिला काहीच दिसत नाही .हातातला पाण्याचा पेला हातातच थबकला डोळ्यात पाण्याचा पडदा साचला. माझे डोळस असणे पण दृष्टीहिन वाटले हाँलमधल्या देवघरात समई तेवत होती देवघरातल्या गणपतीच्या मुर्तीला मनातच हात जोडले आणि म्हटलं तुझ्या समईतल्या तेजाळणार्या ज्योतीतली एकतरी ज्योत दृष्टी म्हणून दे रे.या बाळाला कारण कितीही आकाशात झेप घेतली तरी निःसमर्थ आहोत आम्ही.एकच विनंती जन्माला येणार प्रत्येक बाळ निकोप निरोगी  समर्थ असू दे 
चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख