RTE ची कलमे

RTE ची कलमे खालीलप्रमाणे

RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे

शीर्षक,

कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.

कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.

कलम क्रमांक २ = व्याख्या.

कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.

कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).

कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.

कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.

कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.

कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.

कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.

कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.

कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.

कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.

कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.

कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.

कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.

कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास

प्रतिबंध .

कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक

त्रास प्रतिबंध.

कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .

कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .

कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .

कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .

कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .

कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी

शर्ती.

कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.

कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.

कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.

कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.

कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.

कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.

कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.

कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.

कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.

कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची

स्थापना.

कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची

स्थापना.

कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.

कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.

कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.

कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा

अधिकार.

RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे……

RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे……

तसेच येणा-या शैक्षणिक वर्षात मुख्या.नी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात…

 मुख्याध्यापकाची कामे.

सर्वांना मोफत शिक्षण कायदा २००९ अन्वये

१)वयाचा पुरावा नसतांनाही बालकास शाळेत प्रवेश

दयावा.

शाळेत दाखल करतांना पालका जवळ वयाबाबतचा

सक्षम पुरावा नसतांना सुदधा मुख्याध्यापकांनी

मुलास पालकाच्या प्रतिज्ञा पत्रावरून दाखल केले

पाहिजे.

२) बालकास वर्षभरात केव्हाही प्रवेश देणे.

बालकाला त्याच्या सोईनुसार जेथे सोईस्कर वाटेल

तेथे त्याला शैक्षणिक सत्रात केव्हाही प्रवेश दयावा.

३) विदयार्थ्याचे स्थलांतरण – पालकाचे अथवा

बालकाचे कोणत्याही कारणस्तव स्थलांतर झाल्यास

विदयाथ्र्यास त्याचा शाळा सोडल्याचा दाखला

देण्यात यावा.देतांना विदयार्थी जेथे शिकू इच्छीत

आहे तेथील शाळेच्या मुख्याध्यापकाचे संमतीपत्र

घ्यावे.असे संमतीपत्र प्राप्त होताच संबंधीत

मुख्याध्यापकांनी त्वरित शाळा सोडल्याचा

दाखला हस्तांतरण करावा.

४) वयानुसार प्रवेश- एखादा बालक दुस-या

ठीकानावरून गावात राहण्यासाठी येत असेल तर

त्याला त्याच्या वयोगटानुसार प्रवेश दयावा.नंतर

त्याचा दाखला मिळत असल्यास प्रयत्न करावे.बालक पुन्हा शाळाबाहय होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे.

५) विशेष गरजा असलेल्या बालकाचे शिक्षण – विशेष गरजा असलेल्या बालकास प्रवेश देवून त्याच्या गरजाकडे विशेष लक्ष पुरविण्यात यावे.त्यास उनीव भासवू नये.

६) वंचित व दुर्बल घटकातील बालकाचे प्रवेश व शिक्षण- वंचित व दुर्बल घटकातील बालकास शिक्षण हक्क अधिनीयम २००९ अन्वये २५% प्रवेश देण्याचे बंधन प्रत्येक शाळांवर लागु आहे. व शिक्षणाबाबत

उदासीन धोरण ठेवू नये.तसेच सामाजिक व आर्थिक

दरी निर्माण होईल असे भासविता कामा नये.इतर

बालकासोबत त्यालाही समान संधी देण्यात

याव्यात.

७) बालकाचे सातत्यपुर्ण सर्वकष मुल्यमापन – या

कायदयानुसार यापुढे कोणत्याही बालकास मागे

ठेवता येणार नाही.त्यामुळे त्याला पुढील वर्गात

प्रवेश देतांना मागील वर्गातील अपेक्षीत संपादणुक

पातळी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.त्या करिता

अतिरिक्त अध्यापनाची गरज असल्यास नियोजन

मुख्याध्यापकांनी करावे.

८) शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य – शिक्षण

हक्क अधिनीयम २००९ अन्वये प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक

आहे.समितीचे वेळोवेळी शैक्षणिक विकासाकरिता

आढावा बैठकी बोलावण्यात याव्या. व त्याप्रमाणे

नियोजन करावे.

९) शालेय आपत्ती व्यवस्थापन –

अ)नैसर्गिक आपत्ती –

१) भुकंप २)महापूर ३) वादळे ४) वीज कोसळणे ५) वणवा

लागणे ६) दरड कोसळणे ७) वृक्ष कोलमडणे ८) त्सुनामी

लाटा ९) प्राण्यांचा हल्ला होणे (उदा- कुत्रा

चावणे,सर्प दंश,मधमाशी चावणे,इतर प्राण्यांपासून

दुखापत होईल असे) १०) थंडीची लाट येणे ११)

अतिउष्मा १२) अतिवृष्टी १३) अनावृष्टी/दुष्काळ

पडणे.

ब)मानव निर्मित आपत्ती –

१) आग लागणे २) अपघात ३) विजेचा धक्का लागणे(शॉक) ४) इमारत कोसळणे ५) बॉम्ब स्फोट होणे ६)विषारी वायू गळती होणे ७) चेंगराचेंगरी होणे ८)विषबाधा होणे ९) विदयार्थी अपहरण १०) अचानकउदभवनारे आजार (उदा-

फिट,चक्कर,लखवा,मिरगी,दमा,सारखे इतर)

उपाययोजना –

१) शिक्षक विदयार्थी यांना प्रशिक्षण,मार्गदर्शन

देणे.

२) विवीध कार्यक्रमांचे आयोजन करून जागृती करणे.

३) आपत्ती व्यवस्थापनावर आधारित माहितीपट

दाखविणे.

४) तज्ञ व्यक्तिंची व्याख्याने आयोजीत करणे.

५) स्काउट/गाईड सारख्या चंबुना विशेष प्रशिक्षण

देणे.

६) एखादया तज्ञ शिक्षकाची स्पेशल नेमणुक करणे.

७) एखादा आराखडा आखून ठेवणे.

८) आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करणे.

९) विद्यृत यंत्रणा,प्रथमोपचार यंत्रणा,अग्नीशामन

यंत्रणा,वाळूची यंत्रणा,पाणी यंत्रणा,सुसज्ज ठेवणे.

१०) धोकादायक बाबींची विशेष काळजी ठेवणे.

११) शालेय परिसरात ज्वालाग्रही पदार्थ तत्सम

वस्तुंवर बंदी घालणे.

१२)गरजेनुसार इमारतीची दुरुस्ती करणे.

१३) येजा करणा-या विद्यार्थ्यांना सुचना देणे.

१४) वाहतुक सुरक्षा समिती गठीत करणे.

१५) पोषण आहाराजवळ सुरक्षीतता ठेवणे/पोषण

आहार सुरक्षीत स्थळी ठेवणे.

१६) पालकांचा,तज्ञ

व्यक्तींचा,डॉक्टरांचा,वाहनधारकांचा संपर्क

क्रमांक दर्शनी मांडून(लिहून)ठेवणे.

शासन निर्णय

१)२२जुलै २००४ २) ५ ऑगष्ट २००४ ३) ६ सप्टेबर २००४

संदर्भ सुची – मुख्याध्यापक मार्गदशिका भाग २

शिक्षकांच्या नोंदी

शिक्षकांनी काय नोंदी ठेवाव्यात

१)वार्षिकनियोजन स्वहस्ते लिहलेले असावे

(वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडूनमान्य

करून घ्यावे)

२)मासिकनियोजन

३)घटकनियोजन

४)दैनिकटाचण

५)अद्यावतविद्यार्थीहजेरी

६)विद्यार्थीपालक भेट रजिस्टर (वही)

७)सातत्यपुर्णसर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत

केलेल्या असाव्यात.

८)विद्यार्थ्यांचेवेळोवेळी घेतलेले प्रकल्प

९)ज्याप्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे

त्याची सूची व त्यानुसार दिलेले विद्यार्थीनिहाय

गुणदान

१०)विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्णकेलेले स्वाध्याय

वर्गकार्य पुस्तके

११)विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यांबाबत नोंदी

१२)शैक्षणिक साहित्य.

१३)मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाची जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण करावी

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख