पहिले जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलन 2019 शाळा आमटेम पेण रायगड

*सृजनाला पंख हवे*
*झेपावण्यास आकाश नवे*

'      वरील उक्तीप्रमाणे रायगड *जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाकडे वळवावे वाचणार्‍या मुलांना लिहिण्याकडे म्हणजेच स्व अभिव्यक्तीकडे न्यावे आणि शैक्षणिक गुणवत्ता विकास व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक उर्जस्वल उपक्रम म्हणजे  पहिले रायगड जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलन* रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम शाळेच्या प्रसन्न वास्तूत दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आले होते मराठी भाषेतील समृद्ध साहित्याची साहित्यप्रकारांची भाषेतील या वैभवलेण्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा या मागील हेतू या *बाल साहित्य संमेलनाचे संयोजन उपक्रमशील रायगडकन्या  व शिक्षकवृंद शिक्षण विभाग जिल्हा परिषद रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते* विद्यार्थी अभिव्यक्तीला विचारमंच मिळवून देण्यासाठी केलेल्या बालसाहित्य संमेलन सोहळ्याचे विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम येथील बालसाहित्यिक केतन प्रकाश मोकल इयत्ता सातवी याने या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले तसेच मनस्वी म्हात्रे इयत्ता चौथी शाळा कासू यांनी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष   स्थान भूषवले या साहित्य संमेलनात रायगड जिल्हा परिषद शाळांमधील सर्व तालुक्यांमधून आलेल्या *विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कथा ,कविता, , स्वगत मनोगत , नाट्यछटा ,नाट्यीकरण ,नाटूकले सादर केले अभंग ओव्या भजन किर्तन इ सादर केले* साहित्यप्रकारातील विविधतेची ओळख या अंतर्गत अभंग, भजन, किर्तन, भारुड ओव्या ,पोवाडा ,पारंपारिक लोकगीते, बोलीभाषेतील गीते यांचेही सादरीकरण विद्यार्थ्यांनी यामध्ये केले . *विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हे या संमेलनाचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल* . रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच बाल साहित्य संमेलन  होत असतानाही तसेच सुट्टीचा दिवस असतानाही सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांसोबत होते मराठी साहित्यविश्वातील साहित्यसंपदेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन मिळावे यासाठी *श्री मनोज पाटील श्री चंद्रकांत पाटील श्री म्हात्रे या मान्यवर साहित्यिकांनी बालसाहित्यिकांना विशेष मार्गदर्शन केले* . मराठी भाषेतील समृद्ध भाषा वैभव समजावून दिले अधिक अधिक वाचन करण्यासाठी व लेखन करण्यासाठी प्रेरणा दिली या बाल साहित्य संमेलनाचा देखणा सोहळा रंगला तू अनोख्या *ग्रंथदिंडीने* या ग्रंथदिंडीत पारंपारिक वेशभूषा असलेले विद्यार्थी पालक शिक्षक आमटेम पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी झाले वाचनसंस्कृती रुजवण्याचा आणि टिकवण्याचे  आवाहन करत ग्रंथदिंडीचा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला अध्यक्ष बाल साहित्य संमेलन अध्यक्ष व मान्यवर पाहुणे यामध्ये यांच्या हस्ते उदघाटन सोहळा संपन्न झाला  स्वागत सोहळा साहित्य परंपरा जपणारा अनोखा ठरला बालसाहित्यिकांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांना पुस्तक आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर या साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांना मनोरंजन करण्यासाठी विविध गायन व नृत्य नाट्यीकरण सादर करण्यात आले बालसाहित्य संमेलनाच्या नभांगणात दिवसभरात विविध मान्यवरांनी आपली हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती..
कार्यक्रमास *माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे  व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभय यावलकर साहेब तसेच मा.सौ. स्मिताताई पेणकर मॅडम सभापती पं.स.पेण,  माजी सभापती प.स पेण सौ दर्शनाताई म्हात्रे आमटेम ग्रामपंचायत सरपंच सौ योगिताताई सचिन तांबोळी व ग्रामपंचायत सदस्य तसेच श्री किशोर गायकर  शाळा व्यवस्थापन समिती आमटेम अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते . बालसंमेलन अध्यक्ष- कु.केतन मोकल (शाळा- आमटेम), स्वागताध्यक्ष- कु. मनस्वी म्हात्रे ( शाळा-कासू)मा.श्री. सी.पी. पाटील- गटविकास अधिकारी ( उच्चश्रेणी ) पं.स पेण, सहा. ग.वि. अधिकारी श्री. घरत साहेब, मा. श्री. कुलकर्णी साहेब -ग.शि.पाली सुधागड, मा. श्री. सुनिल गवळी साहेब, मा. श्रीम. शिल्पा पवार- व. वि.अधिकारी पं.स. पेण, मा. श्री. संतोष दौड व सहकारी टिम-अधिव्याख्याता डायट पनवेल ( रायगड) मा. श्रीम.माने मॅडम, मा. सौ. मानसी भोसले - प्रादे.विद्या प्राधि.मुंबई, विषय सहाय्यक  तसेच विविध साहित्य साहित्य क्षेत्रातील मान्यवर या व अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन कार्यक्रमाची प्रशंसा केली*. विद्यार्थांच्या साहित्य प्रकारांचे सादरीकरण व उत्साह पाहून, भविष्यातील साहित्यिक निश्चितच जि.प. च्या शाळेतूनच घडतील या विषयी आशावाद प्रत्येक मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर संदेशात सांगितले आपले मनोगत व्यक्त करताना *रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष  माननीय.आदितीताई तटकरे यांनी या पहिल्या जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले शैक्षणिक गुणवत्ता विकास यासाठी ही अशी संमेलने  व शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम नियमित व मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर व्हावी यासाठी सर्वोतपरी सहकार्य जिल्हा परिषद शासन प्रशासनाकडून करण्याचे आश्वासन त्यांनी सर्वांना दिले. त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम यांच्या प्रांगणात हे संमेलन भरले पहिले बालसाहित्य संमेलन भरविण्याचा मान या शाळेने मिळवला याबद्दल सर्व विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांचे विशेष कौतुक केले.या कार्यक्रमात  मार्गदर्शन करताना रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय अभय यावलकर साहेब यांनी या पहिल्या रायगड जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या उपक्रमशील रायगड रायगड कन्या व शिक्षकवृंद शिक्षण विभाग जिल्हा परिषद रायगड यांचे कौतुक केले तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यामधे असणाऱ्या प्रतिभेला वाव देण्यासाठी हे पहिलेच बालसाहित्य संमेलन आहे या प्रकारची अशी साहित्य संमेलने इथून पुढे प्रत्येक तालुक्यात स्थानिक पातळीवर  नियमित व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले बाल संमेलनाध्यक्ष केतन मोकल याच्याशी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब  यांनी सुसंवाद साधला विद्यार्थ्यांच्या सादरीकरण कथा व कविता सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली*
या.कार्यक्रमात रा. जि.परिषदेच्या अध्यक्षा मा. श्रीम.आदितीताई तटकरे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. अभय यावलकर साहेब(भा.प्र.से.), मा.जि.प. अध्यक्ष व सीईओ साहेबांनी तर हा कार्यक्रम यापुढे जिल्हा परिषद मार्फत ३ दिवशीय निवासी स्वरूपात राबवून स्वतंत्र निधी मंजूर करण्यात येईल असे सांगितले. जिल्हा, राज्यस्तरातून या बालसाहित्य संमेलनाची दखल घेण्यात येऊन अनेकांचे सकारात्मक प्रेरणादायी संदेश, शुभेच्छा प्राप्त झाले.
या संमेलनात *कलादालन या अंतर्गत विद्यार्थ्यांना बाहुलीनाट्याद्वारे मार्गदर्शन  करण्यात आले आदिवासी बोली भाषेतील स्वआभिव्यक्ती गीते यांचे सुंदर सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले या साहित्य संमेलनात हिंदी व इंग्रजी भाषेतील सादरीकरण झाले त्याचबरोबर उर्दू भाषिक विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदवला उत्साहाच्या वातावरणात हे संमेलन पार पडले . हे साहित्य संमेलन आमच्या शाळेत होत आहे म्हणून मला आनंद होत आहे असे मनोगत संमेलनाध्यक्ष केतन मोकल यांनी व्यक्त केले  तसेच टीव्ही मोबाइल व्हाट्सअप फेसबुकच्या जमान्यात विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वाळावे, संस्कारित व्हावे, विचारांनी कृतींना योग्य दिशा देण्यासाठी ,सृजन विकासासाठी व ताणतणावाचे व्यवस्थापन होऊन ज्ञानाबरोबर आनंद मनोरंजनही व विद्यार्थी सर्वागिण विकास होण्यासाठी वाचन संस्कृती रुजवली जाण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते असे मत रायगड जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षिका व उपक्रमशील रायगडकन्या  सदस्य सौ चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव यांनी व्यक्त केले या संमेलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सुट्टीचा दिवस असताना रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातून आलेल्या सर्व बाल साहित्यकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक आणि आभार या पद्धतीची साहित्य संमेलने वैचारिक दिशा देणारी विद्यार्थी घडवणारी विद्यार्थी सर्वांगीण विकासास चालना देणारे आहेत अशी संमेलने असे विविध उपक्रम सातत्याने उपक्रमशील रायगड करण्या शिक्षक वृंद समूह करत राहील जेणेकरून रायगड जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढेल गुणवत्ता वाढेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू असे आश्वासन उपक्रमशील रायगड कन्या शिक्षकवृंद शिक्षण  विभाग रायगड समूहातील सर्व सदस्यांनी दिली या कार्यक्रमाची सर्वच स्तरावरून प्रशंसा व दखल घेतली यातच या अभिनव उपक्रमाचे यश आहे. याचा आंम्हा आयोजकांना अभिमान आहे. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ज्यांनी- ज्यांनी आंम्हाला सहकार्य केले त्या *सर्वांचे उपक्रमशील रायगड कन्या व शिक्षकवृंद व जिल्हा परिषद शाळा आमटेम पेण रायगड यांच्या कडून आभार*

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख