दिव्यांग विद्यार्थी शिक्षण प्रवेश...

. तो एक राजहंस …..आमचा भूषण

                                                                             चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव
         रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम पेण रायगड ९४२११६०६९५

       नेहमीप्रमाणे मी माझ्या कामाच्या गडबडीत होते दिवसभर फोन बघायला वेळच मिळाला नाही म्हणून शेअर रिक्षा जागा मिळतातच मी फोन उघडला आणि व्हाट्सअप वर आलेले मेसेज बघत राहिले माझ्या लक्षात आलं हलकेच त्या बघ आमच्या बाई बाई असा आवाज मला दोन वेळा आला म्हणू त्या गर्दीत समोर पाहिले समोर आमचा भूषण त्याच्या  पत्नीसोबत बसला होता .भूषणला मी विचारले तर त्याची पत्नी म्हणाली मी भूषण ची पत्नी नेहमीप्रमाणे भूषण हसला आणि 2010 पासून त्याचा जीवनपट माझ्या डोळ्यासमोरून गेला भूषण आणि मी भूषण नेहमीप्रमाणे फक्त आणि त्याची पत्नी मला म्हणली आम्ही इकडे आलो होतो आमच्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या भूषण…. 2010 भूषण माझ्या वर्गात आला मी त्यावेळी रायगड जिल्हा परिषद शाळा मुंढाणी आणि पेण येथे कार्यरत होते बदलीनंतर माझ्याकडे आलेला वर्ग म्हणजेच इयत्ता तिसरी व चौथ चा जोड वर्ग आणि त्या जोड वर्गात असलेला भूषण खरंतर जोड वर्गासोबत आणि इयत्ता 1 ते 4 च्या वर्गात काम करण्याचा अनुभव तसा  मला नवीनच वर्गात लक्ष गेल्यावर एक थोडासा उंच वयाने आणि शरीराने वर्गातल्या सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडासा मोठा असणारा भूषण पण शांत भूषण शेवटच्या क्रमांकावर बसायचा पुस्तक सोबत असायचे पण भूषण दप्तर कधी उघडायचं नाही दिवस दिवसभर बसून राहायचा अरे भूषण असं म्हटलं की भूषणची मान खाली कधीतरी शांतपणे फक्त हलकसं हसायचा कधी शाळेत यायचा कधी नाही चार पाच दिवस झाले वर्गात मला काही भूषण चा आवाज ऐकायला मिळाला नाही भूषण शाळा सुटली की जात असे त्यावेळी भूषण चौकशी केली मुख्याध्यापक पाटील सर मला म्हणाले भूषण शांत आहे दोन-तीन दिवसातच मला कळले की हा माझा भूषण हा दिव्यांग विद्यार्थी आहे म्हणजेच एम आर  गटात मोडणारा विद्यार्थी आलेला विद्यार्थी आपला आहे आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करायचं ठरवलं या प्रयत्नात विका पाटील गुरुजी सुहिताबाई बाई महात्रे सर तसेच लेंडी गुरुजी सर्वांनी मला मदत केली शाळा सुरू झाल्यावर इतर मुलांसोबत काम करताना आपल्याला भूषण साठी काहीतरी वेगळं करायचं आहे त्याला लिहीते वाचते करायचा आहे हे मनाशी नक्की केलं त्याची बुद्धी त्याचा समज वर्गातला सहभाग वाढावा आणि त्याचे शिकणे सामान्य मुलांसारखे व्हावे असे वाटत होते भूषण सोबत काम करायचे आणि त्याला लिहिते वाचते आणि बोलते करायचे असे ठरवून कामाला सुरुवात केली प्रयत्न सुरू आला सुरुवात केली सुरुवातीला भूषणचा प्रतिसाद तसा खूपच कमी अगदी नाही असं म्हटलं तरी चालेल कधी कधी मला असं वाटायचं की होईल ना माझ्याकडून हे मी मुलांना म्हणायचे सुद्धा अरे होईल ना रहे कसा रे हा असा पण मुलं म्हणायची बाई शाळेत नाही बोलत पण घरी आमच्या शी बोलतो आणि असा आमचा भूषण चा प्रवास शिक्षणाकडे सुरू झाला भूषण सुरुवातीला थोडा अस्वच्छ राहायचा अंघोळ करायला सांगयला  लागायचे त्या गोष्टीचा पाठपुरावा करून स्वच्छ कपडे घालून आला की त्याला छान छान दिसतोय एकदा असे सांगावे लागे तर असं ठरवलं की आता भूषण ला आपण इथेच ब्रश करून सगळं स्वच्छ हातपाय धुवायला लावायचं आणि तसं नळावर पाठवलं आणि तो हात पाय स्वच्छ धुऊन आला हळूहळू त्याला स्वच्छतेचे महत्त्व समजत गेलं आणि आता अडचण दूर झाली वैयक्तिक स्वच्छता सुरू झाली आता भूषण प्रवास शिक्षणाकडे कसा आणता येईल याकडे आम्ही प्रयत्न केले सुरुवातीपासूनच केली शब्द आणि अक्षर चित्र आणि अक्षर वाचन लेखन या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली भूषण प्रगती कमी होती पण त्याला शिकण्याची मात्र आवड होती माझ्यासोबत अक्षर अंक गिरवताना पाठीवर लिहायचं खूप मोठा काढायचं सुरुवात झाली व्यवस्थित काढायला थोड्या अडचणी होत्या पण हळूहळू सहकारी आणि व भूषणचे वर्गमित्र म्हणजे माझे विद्यार्थी यांच्या मदतीने हे काम सोपे होत गेला अक्षर काढताना ते अक्षर खूपच मोठं काढायचं वाकडेतिकडे काढायचं कधीकधी लिहायचा कंटाळा करायचा असं थोडं फार चालायचं पण अक्षर तक्ता चित्रवाचन चित्रकार या सगळ्या गोष्टींचा आणि त्याच वेळेला आनंद भाषाशिक्षण वाचन कार्ड इयत्ता पहिली याचा उपयोग भूषण बरोबर चौथीच काम करताना झाला वर्ग मित्रांचे सहकार्य आणि भूषणला शिक्षणात मिळाला निर्माण झालेली गोडी यामुळे आता त्याचं काम सुरू झालं आणि थोड्याफार प्रमाणात मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न करू लागला आता मात्र माझी जबाबदारी वाढली एक मात्र भूषण च्या बाबतीत सांगावं लागेल की सूचना देऊन भूषण हात पाय धुवून स्वच्छ धुऊन आला अरे वा मस्त दिसतोय छान दिसतोय भूषण छोट्या छोट्या गोष्टींमुळे यामुळे डोळ्यामध्ये आत्मविश्वासाची  
भूषण च्या स्वच्छ राहण्यासोबतच त्याचं कौतुक केलं अरे वा भूषण तू छान दिसतेस रे व कसा छान स्वच्छ येत जा यामुळे हळूहळू  आत्मविश्‍वासाची चमक भूषण च्या डोळ्यांमध्ये दिसू लागली त्यामुळे स्वच्छतेकडे त्याचा ओढा वाढला शाळेचा आधार मित्रांची मदत आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळे भूषण शिक्षण प्रवाहात येण्यास तयार झाला माझ्याकडे आलेले  मुल आहे ते समजून घेणं जसं आहे तसं स्वीकारणं आणि त्याच्यासोबत काम करणा-या सकारात्मक विचारामुळे मलाही काम करायला एक प्रेरणा मिळाली शब्द वाचन आणि हळूहळू त्याच्यासोबत काम करायचं ओळखायची सोपे वाक्य असं भूषण चा प्रवास हळूहळू सुरू झाला अक्षरे गिरवणे चित्र ओळखणे अक्षराने चित्र यांची जोडी लावून अंक आणि अक्षरे याची जोडी लावून या गोष्टीची आपल्याला मदत झाली त्या दरम्यानच आमच्याकडे एक प्रशिक्षण झालं होतं समावेशित शिक्षण त्याच्या सोबत असणारी कार्यपुस्तिका तसेच दिव्यांगाना शिकवणारे विशेष शिक्षक यांच्या मदतीने भूषण साठी आणि सोपा कृती आराखडा तयार केला खूप शांत डोक्याने आणि संयमाने काम करावं लागत होतं तिथे मात्र माझी कसोटी होती पण भूषण मात्र हळूहळू थोडाफार सराव करत होता त्याचा प्रवास सुरू होता कधीकधी त्याच्या बाबतीत व्हायचं पण चांगलं काम करेल आज शिकवलेले विसरायचं असंही त्याच्याबाबतीत व्हायचं पण त्यांनी जेव्हा जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा त्याला शाबासकीची थाप मिळाली आपल्याला काहीतरी येते बाई आपल्याला शाबासकी देत आहेत मुल आपल्याला छान म्हणतात आपल्यासाठी आपले वर्गमित्र टाळ्या वाजवत आहेत याचा भूषण मला खूप आनंद झाला त्यांनी लिहिलेलं अक्षर त्यांनी काढलेले चित्र सर्वांसमोर आणून सर्वांना दाखवायचं असं दिनक्रम सुरू केला भूषण प्रतिसाद बोलणं कमी शांत हा शब्द असा भूषणचा प्रवास सुरू राहिला हे वर्गातलं काम कमी पण शाळेच्या मैदानावर काम करताना मात्र गंमत यायची वर्गाबाहेर खेळताना तसं भूषण कुठला राग यायचा कोणी चिडले खोटं बोललं की भूषण मात्र त्या मुलांना चांगलाच मार द्यायचा म्हणून त्याला खेळायला कोणी घेत नसे मोठा असल्यामुळे त्याच्यापासून लांब असायची पण हळूहळू  राग कमी करण्यासाठी काम सुरु केले भूषण चौथीचा वर्ग सांभाळायचा सांभाळायचा म्हणजे नुसतं शांत उभा राहिला आणि मुलांना दंगामस्ती करण्यापासून थांबवायचा आपण आता मॉनिटर झालोय आपली जबाबदारी वाढली आहे हे भूषण च्या लक्षात आलं हळूहळू तो वर्गातल्या मुलांना शांतपणे समजावून घेऊ लागला त्याची कमी झालं नियमित शाळेत येणे जगात शांत बसणं हे भूषणचे सुरू झाला वर्ग नियंत्रणावर सोबतच वर्गाची साफसफाई करणं स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवणे याकडे भूषण लक्ष देऊ लागला तुलाही जमेल हे म्हटल्यामुळे शिक्षक हे आपले मित्र आहेत शाळा आपल्याला काहीतरी वेगळे देतील आत्मविश्वासामुळे आणि समावेश शिक्षणाच्या मदतीने त्याच्या बौद्धिक आकलनानुसार पातळीनुसार त्याच्यासाठी लिखाण सुरू केलं त्याचा पेपर सुद्धा सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडेसे वेगळे विद्यार्थी असल्यामुळे कमी असल्यामुळे त्याच्या पेपर होते अक्षर गिरवा अक्षर आला जोडी लावा वेगळे अक्षराला गोल करा चित्र रंगवा कोलाज करा असा भूषण पेपर पेपर मध्ये वर्ग चाचणी मार्क मिळवू लागला शिक्षणांतर्गत त्याने त्या विषयात काम करत आघाडी घेतली अक्षर आणि अंक अक्षर आणि शब्द सोपी बेरीज अशी ही भूषण कामाची सुरुवात हळूहळू सुरू झाली त्यातच 15 ऑगस्ट तयारी करताना पूर्वतयारी सुरू झाली अर्थातच 15 ऑगस्ट ची तयारी सात-आठ दिवस अगोदर सुरू झाली साफसफाई आणि स्वच्छता रंगरंगोटी यात भूषण हिरहिरीने भाग घेऊ लागला आणि त्याचबरोबर त्या वेळेला 15 ऑगस्टला एक समूह घोषणा देण्याचा सराव सुरू झाला त्यामध्ये एक घोषणा होती साक्षर जनता भूषण भारता या गोष्टीमध्ये भूषण होतं ऐकल्यावर ही घोषणा ऐकल्यावर यात आपलं नाव आहे असा एकूण भूषण मस्त हसायचा आता ठरवलं की घोषणा आपण भूषणला दिली तर भूषण काय रे देशील ना घोषणा साक्षर जनता भूषण भारतात सुरू झाला सराव तर सुरू झाला पण प्रत्यक्ष 15 ऑगस्ट दिवशी सर्व ग्रामस्थ लोकांसमोर भूषण घोषणा देईल का याची मात्र धाकधूक होती कारण कधीकधी सरावाला तो प्रतिसाद द्यायचा तर कधीकधी तो विसरून जायचा पण मैदानावर घोषणांच्या क्रमामध्ये त्याची घोषणा सगळ्यात शेवटी ठेवली का प्रतिसाद नाही आला तरी काही अडचण येऊ नये पण भूषण मात्र ही घोषणा साक्षर जनता भूषण भारता असं अभिमानाने म्हणत होता प्रत्यक्ष पंधरा ऑगस्ट स्वतंत्रदिन दिवशी सुद्धा भूषण ने खणखणीत आवाजात ही घोषणा दिली 15 ऑगस्ट स्वतंत्र दिना साठी जमलेले सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक भूषण च्या या घोषणेने आणि त्याच्या या प्रगतीने खुश झाले आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं त्याचबरोबर भूषण ला सर्वांसमोर बोलावलं टाळ्या वाजवल्या आणि त्याला छोटीशी भेट बक्षीस पेण सुद्धा दिले याचा त्याच्या प्रगतीमध्ये नक्कीच परिणाम चांगल्या पद्धतीने झाला खरंतर  त्या घोषणेचा मतितार्थ भूषण मला समजत होता की नाही ते माहित नाही पण ती घोषणा माझं नाव आहे म्हणून मात्र त्याला आनंद देत होती आणि त्याचे प्रयत्न चालू होते आपलं काम योग्य दिशेने चाललंय याचं आता समाधान मला जाणवू लागलं 15 ऑगस्ट ला छान तयार होऊन आलेला भूषण घोषणा देणाऱ्या भूषण आणि चांगलं काम केलं म्हणून त्याला बक्षीस मिळालेला भूषण आनंददायी प्रवास सुरू झाला यानंतर वर्ग कामात भूषण सहभाग वाढला काना असलेले शब्द काना मात्रा नसलेले शब्द सोपी वाक्य कमी कमी वेगाने का होईना थोडसं वाचू लागला सामुदायिक कविता गायनामध्ये एखादे एखादी ओळ हळूहळू मुलांसोबत भूषण बोलू लागला लिखाणाचा वेग कमी होता पण सातत्य मात्र होतं इतर कामांमध्ये भूषण मात्र हुशार होता वयाने थोडा मोठा असल्यामुळे आणि घरात कामाला मदतीला कोणी नाही म्हणून चौथीत असताना सुद्धा भूषण शेतीची काम करायचा बाबांसोबत शेतात जाणे पेरणीला मदत करणे नांगरणी करणे शेतात जाणे या कामांमध्ये आपल्या वडिलांना मदत करत होता पुढाकार घेत होता पावसाच्या दिवसात लावणी असते त्यामुळे त्या लावणीसाठी शेतावर त्याला जावे लागत होतं त्याची उपस्थिती कमी झाली त्याच्या घरी शेती होती आणि शेतीसाठी बाबांच्या मदतीला जाणं गरजेचं होतं शाळेत जात असताना नांगर घेऊन शेतात असायचा भूषण पावसाळा आणि लावणीचा हंगामात भूषण हे शेतात आई-बाबांच्या मदतीला जाणून काम चालू होतं शाळेतून घरी परत जाताना कधीकधी बांधावर भूषण मला बैल घेऊन आलेला नांगर घेऊन आलेला दिसायचा काय रे भूषण विचारलं भूषण विचारलं की भूषण फक्त शांतपणे खाली मान घालायचा आणि हलकसं हासायचा लावणी कापणी झोडणी त्या कामात मदतीला जावे लागत असल्यामुळे त्याची उपस्थिती थोडी कमी झाली पण शाळेत आल्यावर मात्र तो सगळ्या गोष्टी छान करत असेल शाळा भेट घेऊन शाळेतून पालक भेट घेऊन त्याच्या पालकांना सांगायचं आम्ही भूषण करतोय हा तुमचा भूषण नीटनेटका राहतोय शाळेत येतोय स्वच्छ राहतोय थोडा थोडा अभ्यास करतोय येते त्याला जमतय त्याला ऐकून त्याच्या बाबांनाही समाधान वाटायला सुरुवात झाली आता हळूहळू पुस्तक काढून कविता म्हणायचं सुरू झाला भूषणला खेळाची आवड होती तो आमचा कबड्डी चाम्पस त्यामुळे मैदानावर मुलांसोबत खेळायचं कोण पडलं झडलं तर त्या मुलांना लगेच उचलून आणायचं त्यांना औषध लावायचं हे काम भूषण अगदी व्यवस्थित करत असेल शाळेतून परत जाताना शेताच्या बांधावरुन जायला लागत असे त्यामुळे बांधावरून निसरडे असेल तर त्या छोट्या मुलांना हळूहळू घेऊन जायचं हाताला पकडून पलीकडे घेऊन जायचं त्यांना मदत करायची हे भूषण ची सवय होती दिव्यांग विद्यार्थी मात्र इतरांना मदत करत होता परिपाठामध्ये प्रश्नांची उत्तरं कविता गायन सुरू केला आणि नियमित होत गेला 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचा कार्यक्रम तयारी सुरू झाली पण तिच्या कार्यक्रमात सर्वांनी भाषण नाटिका गीत गायन असं नियोजन ठरलं आम्ही भूषण ला विचारलं काय रे भूषण तू भाषण करशील का भूषण आणि भाषण खरच खूप छान  जमलं त्याच्या कुवतीप्रमाणे चार ओळीचे भाषण महात्मा प्रमाणे महात्मा गांधी त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी आईचे नाव पुतळीबाई त्यांचा जन्म येथे झाला त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम असं छान भाषण केलं टाळ्यांच्या कडकडात लगेच त्याला बक्षीस मिळाले आणि त्याचा विशेष म्हणजे त्याचा फोटो काढला फोटो त्याला जास्त आनंद देऊन गेला मराठी इंग्रजी वाक्य इंग्रजी संभाषण यासाठी आम्ही एक उपक्रम सुरू केला होता यामध्ये माय नेम इज भूषण आय लाईक फिश अशी छोटी छोटी वाक्य परिपाठ आला बोलून दाखवायची यातही भूषण इंग्रजीची एक दोन वाक्य बोलण्याचा प्रयत्न करत होता कधीकधी घाईगडबडीत भूषण वाक्य विसरायचा आणि शांत उभा राहायचा चिडवायची वाईट वाटायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करायची आणि त्याप्रमाणे तो बोलायचा इंग्रजी वाक्य बोलताना कधीकधी भूषण वाक्यात विसरून जायचा आणि शांती भरायचा कधीकधी शब्दच विसरून जायचा मुले हसायची चिडवायची कोणी त्याला मदत करायचं शब्द आभ्यासातल्या प्रगतीबरोबर भूषण खेळात मात्र हुशार होता एक ते चार च्या गटात वयाने मोठा व समावेश शिक्षणाचा विद्यार्थी पण कबड्डी छान खेळायचा आमच्या कबड्डी संघाच्या विजयाचा शिल्पकार आमचा भूषण त्याच्या गतीने वतीने त्याचा प्रवास सुरू झाला समावेश शिक्षणांतर्गत वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षणात प्रवास त्यामुळे भूषण शिकणं हळूहळू सुरू झाला भूषण मात्र शांत झाला आता मात्र त्याला वेळप्रसंगी घरकामात मदत आणि शाळा असा प्रवास सुरु झाला शिक्षण आणि मूल्यमापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन त्याप्रमाणे काम आणि त्याची मूल्यमापन श्रेणी असं करत करत भूषण प्रवास पुढे गेला हळूहळू हळूहळू भूषण त्याच्या गतीने समावेशित शिक्षण आर टी इ यामुळे त्याचा प्रवास सातवीपर्यंत झाला सातवीतुन तो आठवीला गेली माझी बदली झाल्यामुळे माझा आणि भूषण चा संपर्क कमी झाला अधेमधे माझे विद्यार्थी भेटले की मी भूषण ला विचारत असे भूषण कसा आहे काय करतोय मुलांनो भूषण तुमचा मित्र आहे त्याची काळजी घ्या असं मी त्यांना सांगत असे मला एवढेच म्हणायचे आहे की दिव्यांग विद्यार्थी असले तरी समाज कुटुंब शाळा शिक्षक वर्गमित्र या सगळ्यांच्या सहकार्याने या मुलांचा शिक्षणाच्या प्रवाहात प्रवेश होतो आणि त्याच्या त्याच्या पद्धतीने त्यांची प्रगती होते आणि सर्वसामान्य असो की दिव्यांग असून मूल शाळेत येण शकतो होणं टिकतं होणं हे महत्त्वाचं आणि यासाठी ही सर्वांची जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून प्रामाणिक प्रयत्न हेसुद्धा महत्त्वाचे आहेत शिक्षण थांबल्यानंतर भूषण हे घर आणि शेतीत लक्ष घातले त्याचं आता लग्न झालाय त्याच्या पत्नीने म्हटलेले एक वाक्य मला आठवलं की त्यांना बाकी सगळ्यात गती नसेल पण शेतीच्या कामामध्ये माझे मिस्टर आहेत या एका वाक्यातच सगळे यश सामावलेला आहे प्रामाणिकपणे मेहनतीने कष्ट करणे भूषण असणारा अतिशय चांगला गुण आहे आणि यामुळेच सगळ्यांच्या मदतीने भूषण आता त्याच्या आयुष्यामध्ये स्थिरावला त्याला योग्य पत्नी मिळाली आणि त्याचा संसार सुखाचा चाललाय कन्यारत्न प्राप्त झाले जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगावसं वाटतं की दिव्यांगा चा कुठलाही प्रकार असो विद्यार्थ्याला स्वीकारलं आणि मदत केली तर त्याची प्रगती नक्कीच होते त्यांना सोबत घेऊन निरामय जीवन जगू शकतात आणि ते जगणं हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क आपण त्यांना मिळवून दिला पाहिजे आणि शिक्षण यातूनच समाजात समावेश होतो  हे स्वीकारा आणि मदत करा हे माझ्या अनुभवातून शिकले आपण तसं करावं ...आम्ही असू लाडके सर्वांचे लाडके सर्वांचे ….या निरागस निर्मळ मुलांना माया आपुलकी सातत्य त्यांच्यासाठी नवे प्रयत्न नव्या वाटा नव्या संधी आणि जीवनात जीवन कौशल्य प्राप्त करून छोट्या-मोठ्या व्यवसायातून स्वावलंबन या गोष्टीची गरज आहे सहकार्य केलं तर हे नक्कीच यश येते एक साधीसोपी घोषणा साक्षरता टर्निंग पॉइंट ठरले असे कितीतरी भूषण आपल्या आजूबाजूला असतात त्यांना समजून घेऊया आणि आपल्यासोबत घेऊन समर्थ आणि सक्षम भारत घडवूया असं मला वाटतं सांग भूषण आमचा विद्यार्थी भूषण भूषण तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

सौ चित्ररेखा रवींद्रनाथ जाध
व रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम   
तालुका  पेण जिल्हा रायगड
९४२११६०६९५

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख